जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील ओढा पात्रातून शासनाला एक रुपयाही न भरता वाळूतस्कर हजारो ब्रास वाळूूूचा उपसा करीत आहेत. त्यामुळे शासनाला जाणारा कोट्यवधींचा महसूल तस्करांच्या खिशात जात आहे. याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शासकीय व राजकीय यंत्रणेचीही साथ लाभत असल्याने वाळूतस्कर महसुल यंत्रणेच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.