सिध्देश्वर स्वामीजी पुढे म्हणाले,पापकर्माचा लवलेश स्वप्नातील मनातही न आणणारा आहे, परम पुण्यमयी असा सद्गुरू नित्य माझ्या मनी राहो! अगदी शब्दश: गुरुंप्रति भावनेशी एकरूप जीवन सिद्धेश्वर स्वामी तंतोतंत जगताहेत.
अधात्मातील अनेक विषयाची माहिती देत जीवन स्वच्छ, निरोगी,सत्यता बाळगत जगा,देवाने आपल्याला दिलेल्या शरिराचा चांगला उपयोग करा,असेही सिद्धेश्वर स्वामीजी यांनी सांगितले.
गावातील ऐतिहासिक महादेव मंदिराला सिध्देश्वर स्वामीजी यांनी भेट देत ग्रामस्थांनी केलेल्या उत्कृष्ट कामाचे कौतुक केले.
माडग्याळ ता.जत येथे प्रर्वचन सांगताना ज्ञानयोगी सिध्देश्वर स्वामीजी