जत,संकेत टाइम्स : जत तालुका कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी सज्ज झाला असून दुसऱ्या लाटेत झालेली ऑक्सीजन टंचाई लक्षात घेऊन जतेत 31 जम्बो सिलेंडर क्षमता ऑक्सीजन प्लँटचे लोकार्पण करण्यात आले आहे.
 आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2021/22 अंतर्गत आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या निधीतून मंजूर झालेल्या जत ग्रामीण रुग्णालय जत येथील ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते संपन्न झाले.यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग,जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील,उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे,डिवायएसपी रत्नाकर नवले,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर,डॉ.इरकर,क्लर्क सानप,माजी सरपंच मारुती पवार,माजी नगरसेवक निलेश बामणे,जत शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आकाश बनसोडे,माजी उपसरपंच दिलीप सोलापुरे सावकार,युवक नेते राजू यादव,व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार विक्रमसिंह सांवत म्हणाले,पहिल्या व दुसऱ्या लाटेत तालुक्यात ऑक्सीजन व बेड‌ न मिळाल्यामुळे काही रुग्णाची गैरसोय झाली होती. लागला होता.आता तालुक्यात कोरोना रुग्णालये,ऑक्सीजन प्लँट उभा असल्याने तिसरी लाट आलीच तर मोठ्या ताकतीने कोरोनाचा सामना करू,असे यावेळी आ.सांवत म्हणाले.


जत ग्रामीण रुग्णालयात स्थानिक आमदार निधीतून सुरू झालेल्या ऑक्सीजन प्लँटचे लोकार्पण आ.विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते संपन्न झाले.