जत,संकेत टाइम्स : जत शहरात ’मागील सहा वर्षांत विकास होवो न होवो ’मात्र खड्ड्यांचा विकास मात्र भरपूर झाला आहे. आता रस्त्यात खड्डे आहेत की,खड्ड्यात रस्ता हे सांगणे कठीण झाले आहे.नऊ वर्षपुर्ण झाली, नगरपालिका विकास कधी करणार हा प्रश्न निरूत्तरीत राहिला आहे.नव्याने सत्तेत आलेल्या पदाधिकाऱ्यांकडून शहरात कधीतरी चांगले रस्ते होतील भाबड्या आशेवर असलेल्या चार वर्षापासून आसलेल्या नागरिकांच्या मात्र थेट मणक्याला दणका बसू लागला आहे. नाका तोंडात धुरळा जाऊन जीव गुदमराला लागला आहे.नऊ वर्षांत जे रस्ते केले त्यावरही खड्डे आणि जे रस्ते केले नाहीत, त्यावर तर खड्डेच खड्डे अशी दुर्दशा झाली आहे. खड्डे आणि त्याधून उडणाऱ्या धुरळ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नगरपालिकेत सत्तास्थानी येऊन तब्बल नऊ महिन्याचा कालावधीनंतर परिस्थिती जै-थैच आहे.रस्त्यावर खड्ड्याचा घेर वाढला आहे. निवडणूकीच्या आदी असणारे खड्डे दुप्पट बनले आहेत.तरीही रस्ता दुरूस्ती कडे दुर्लक्ष का?असा संप्तत सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे.सध्याच्या जत शहराच्या बकाल अवस्थेवरून दिसत आहे. जत तालुक्याची आण, बाण अन् शान असलेल्या जत शहराची बकाल नगरी करण्याचे पाप कोणाचे? असा सवाल आता मतदारांतून विचारला जाऊ लागला आहे.