जत,संकेत टाइम्स : शिक्षकांमुळे गुणवंत विद्यार्थी घडतात शिक्षक हा आदर्श समाज घडविण्याच्या प्रक्रियेतील महत्वाचा घटक आहे,कोरोनाच्या कठीण प्रसंगात कोरोना योध्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे, प्रतिपादन जत शहर काँग्रेस अध्यक्ष तथा नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांनी केले.
शिक्षकदिनाचे औचित्य साधून जत शहरातील जिल्हा परिषद मराठी शाळा येथे  कोरोना योद्ध्यांचा व शिक्षकांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी
नगरसेवक कांबळे बोलत होते.यावेळी विक्रम फाऊंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम, युवा नेते योगेश मोटे,मोहन माने-पाटील, संतोष देवकर पत्रकार मनोहर पवार, पत्रकार अनिल मदने, गट समन्वयक संभाजी कोडग, तलाठी चाचे, राबिया शेख यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.