जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील ७ गावात १५ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्यात कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात खालावला असून येत्या सणामध्ये नागरिकांनी गर्दी टाळून सण साजरे केले तर कोरोना प्रभाव वाढणार नाही,अन्यथा धोका होऊ शकतो.मंगळवारी तालुक्यातील जत ३,पांढरेवाडी १,डफळापूर १,येळवी १,सनमडी १,बसर्गी १ कोसारी ७ येथे नव्या रुग्णाची नोंद झाली आहे.२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर २३५ रुग्ण सध्या उपचाराखाली आहेत.