याबाबतची अधिक माहिती अशी कि,
विनायक कलाल हा जत शहरातील एका गॅरेज मध्ये कामाला होता.मंगळवारी सुट्टी असल्याने तो व अन्य 5 मित्र बिरनाळ तलावात पोहण्यासाठी गेले होते.
त्यातील चोघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते.
विनायकला पोहता येत नसल्याने कडेला उभारून अंघोळ करत होता.दरम्यान कडेला शिवाळ झालेल्या दगडावरून पाय घसरल्याने विनायक पाण्यात बुडू लागला,जवळच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला.मात्र दुर्देवाने विनायक खोल पाण्यात बुडाल्याने त्यांचा मुत्यू झाला. दरम्यान पोलीसांना या घटनेची माहिती देण्यात आली.पोलिस व स्थानिक नागरिकांनी रात्री पर्यत मृत्तदेह शोधण्याचा प्रयत्न केला मात्र सापडला नाही.आज सांगलीतील जीवरक्षक टिमला पाचारण केले आहे.कष्टाळू असलेल्या विनायकच्या मुत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.