संख येथे तरूणांची आत्महत्या

जत,संकेत टाइम्स : संख ता.जत‌ येथे तरुणांने गळपास लावून आत्महत्या केली.सैदू धर्माण्णा धाबेकर (वय 28)असे त्या तरूणांचे नाव आहे.याप्रकरणी उमदी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.


अधिक माहिती अशी,सैदू धाबेकर हा गंवडी काम करत होता.गेल्या काही दिवसापुर्वी त्यांच्या पत्नीने घटस्फोट घेतला होता.त्यामुळे मानसिक दबावात होता.त्या नैराश्यातून बुधवारी मध्यरात्री आतील खोलीत त्यांने दोरीने गळपास लावून आत्महत्या केली. सकाळी हा प्रकार समोर आला.उमदीचे सा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर यांनी घटमास्थळी भेट दिली आहे.