राजारामबापू पाटील यांचे अधुरे स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्यांचे सुपुत्र तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जत तालुक्याला 6 टीएमसी पाणी उपलब्ध करत वंचित 65 गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.
या घोषणेनंतर ना.पाटील हे प्रथमच जत तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते.
माडग्याळ येथे बापूचे कार्यकर्ते कृष्णदेव गायकवाड यांनी ना.पाटील यांचा जंगी सत्कार केला.आमच्यावर पिढ्यानं पिढ्या झालेला अन्याय पुसून काढून 6 टी एम. सी पाणी उपलब्ध करून दिल्या बद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की,या भागाचा दुष्काळ कायमस्वरूपी संपविण्यासाठी सिंचन योजना गरजेची आहे.त्यासाठी आता पाण्याची उपलब्धता झाली असून पुढील दोन वर्षात विस्तारित योजना मंजूर करून पुर्ण करू असे आश्वासन दिले.
सरपंच अप्पू जत्ती, तंटामुक्त अध्यक्ष काशिनाथ माळी, मारुती गायकवाड, राजू कांबळे, विजय वाघमारे, गणेश पवार, दशरथ सावंत,जयसिंग गायकवाड,संतोष बोगार,पत्रकार विजय चौगुले,नागेश ऐवाळे,शुभम पाटील,रहीम मुल्ला आदी कार्यकर्ते उपस्थित होते.