जत तालुक्याचा विस्तार क्षेत्र मोठा आहे. जतपासून उमदी 60 किलोमीटर तर संख 45 किलोमीटर अंतरावर आहे.उमदी-संखचे अंतर 27 किलोमीटर आहे.आता अप्पर तहसील कार्यालय संख येथे सुरू झाले आहे.या परिसरातील लोकांना संख येथे जायला एसटीची वेळेवर सोय नाही. शिवाय उमदी हे ठिकाण पंढरपूर-विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावर (क्रमांक एनएच 516 अ) आहे. भविष्यात उमदी-संख तालुका झाल्यास या मार्गावर दळणवळण वाढणार आहे.
सध्या उमदीमध्ये विविध शैक्षणिक संस्थांचे जाळे विणले जात आहे. त्यामुळे वर्दळ वाढणार आहे. उमदी परिसरातील लोकांचे बहुतांश व्यवहार मंगळवेढा,पंढरपूर (जि.सोलापूर), इंडी,विजयपूर (कर्नाटक) या भागाशी आहेत.त्यामुळे आगाराला चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
सध्या जतमधून तालुक्यातील सर्वच गावांमध्ये होणार्या बस खेपा फारच कमी आहेत.
त्यामुळे जतच्या पूर्वभागात एसटीचा वर्दळ कमी आहे. शिवाय एसटीकडे गाड्यांची कमतरता,गळक्या-मोडक्या-तोडक्या गाड्या, चालक-वाहकांची अपुरी संख्या यामुळे आहे त्या गाड्या वेळेवर येत-जात नाही. नव्या गाड्या सुरू करता येत नाहीत.या सगळ्यांचा विचार करता जत पूर्वभागात उमदीला नव्या आगाराची स्थापना करून बसस्थानक उभारण्यात यावे.
प्रशस्त बसस्थानक गरजेचे
जत तालुक्यातील मोठे गाव उमदी आहे.येथून महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील शेकडो प्रवाशी दररोज ये-जा करतात.येथे सुसज्ज बसस्थानकाची इमारात बांधण्याची आमची मागणी आहे.सध्या वाढलेली वाहतूक व भविष्यात प्रवाशांना सोयी-सुविधां देण्यासाठी सुसज्ज बसस्थानक उभारावे..
निवृत्ती शिंदे, कॉग्रेस नेते,उमदी
सध्याचे समस्याग्रस्त एसटी पिकअप शेड