राष्ट्रवादी कॉग्रेसच्या संवाद यात्रेस सुरूवात | 11 संप्टेबरला संखमध्ये भव्य मेळाव्याचे आयोजन

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील वंचीत 65 गावासाठी जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे योजना गतीने पुर्ण करावी,यासाठी 11 संप्टेबर 2021रोजी संख येथे राजारामबापू पाटील प्रशाला संख येथे शेतकरी मेळावा आयोजित केला आहे.यासाठी रवीवारपासून जत तालुक्यात संवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे.या संवाद यात्रेस पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे,यात्रेचे गावोगावी स्वागत केले जात आहे.जनतेतून आनंद व समाधान व्यक्त केले जात आहे.


यावेळी माजीसभापती सुरेशराव शिंदे,माजी सभापती प्रकाश जमदाडे,मन्सूर खतीब,माजी उपसभापती जे के माळी,कार्याध्यक्ष उत्तम चव्हाण,सचिव सुभाष बसवराज पाटील,जत मार्केट यार्ड सभापती देवगोंडा बिराजदार,ज्येष्ठ नेते सिधुमामा शिरसाड,शंकरराव गायकवाड,माजी नगरसेवक भैया कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.रविवारी निगडी खुर्द,काराजनगी,कोळगिरी,सिध्दनाथ, जालिहाळ खुर्द,पंढरेवाडी, आसंगी तुर्क,धुळकरवाडी मोटेवाडी,कागनरी, तिकोंडी ,पंडोझरी ,खंडनाळ या गावातील जनतेशी संपर्क साधून मेळाव्याला उपस्थिती राहण्याचे आवाहन करण्यात आले. 


जत : राष्ट्रवादी कॉग्रेसच्या संवाद यात्रेस सुरूवात करण्यात आली आहे.