बनाळी, वार्ताहर: सोलर सिस्टिम बसवून शासकीय अनुदान मिळवून देतो म्हणून बनाळीतील एका शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.सचिन ब्रम्हदेव जगताप रा.बनाळी असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. कोसारीतील आप्पासो गळवे या दोघांच्याकडून ओळखीचा फायदा घेत सुमारे 20 लाखाची फसवणूक केली आहे.या दोघींनीही जत पोलिसात तक्रार दिली आहे.भारत गणपतराव हापसे (रा.उजळेवाडी,ता.करवीर),सचिन वंसत सकटे(रा.वरगेवाडी,ता.जत),नागेश शिवाजी चौगुले(रा.गडहिंग्लज),जयंत घोलप(लक्ष्मीनगर,पुणे)अशी फसविणाऱ्यां संशियतांची नावे आहेत.गळवे व जगताप यांच्याशी सचिन सकटे यांच्याशी ओळख झाली होती. त्यातून सकटे यांने रियाबल सोलर सिस्टिम कंपनीत माझे मित्र काम करत आहे.सोलर सिस्टिम बसवून तुम्हाला शासकीय अनुदान मिळवून देतो म्हणून सांगितले.त्याशिवाय त्यांनी जमिनीची पाहणीही केली होती. विजेचा कायमचा प्रश्न असल्याने सोलर मुळे फायदा होईल या उद्देशांनी या दोन शेतकऱ्यांनी तयारी दर्शवली.नेमके ही संधी साधत सकटे व त्यांच्या तिन मित्रांनी आधारकार्ड, पँनकार्ड,मतदान ओळखपत्र,शेतीचा सातबारा उतारा कागदपत्रे घेत.टप्या टप्यात सुमारे 20 लाखाची रक्कम घेतली.पंरतू बरेच दिवस सोलर सिस्टिम न मिळाल्याने त्यांनी सकटे व त्यांच्या मित्राना फोन केला,मात्र त्याचे फोन बंद झाले होते.त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे शेतकरी गळवे व जगताप यांच्या लक्षात आल़्याने त्यांनी जत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत.
