माडग्याळी मेंढी खरेदीसाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहितेपाटील कुणीकोणूरमध्ये

माडग्याळ, संकेत टाइम्स : भारतीय जनता पक्षाचे नेते,तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील माडग्याळी मेंढी खरेदीसाठी जत तालुक्यातील कुणीकोणूर येथे येऊन प्रत्यक्ष मेंढपाळांच्या मेंढ्याच्या कळपात जाऊन निवडक जातिवंत सात माडग्याळी मेंढी खरेदी केल्या.यामुळे देशभरात माडग्याळी मेंढीचा लौकिक कायम राहिला आहे.
यावेळी मोहिते पाटील यांचा कुणीकोणूर गावाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी बोलताना विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले,कुणिकोणुर (आबाचीवडी) सारख्या छोट्याशा गावात गेली चाळीस चाळीस वर्ष माडग्याळ मेंढीचे चांगल्या पद्धतीने पैदास व संवर्धन केले जात आहे.त्यामुळे आज माडग्याळ मेंढी महाराष्ट्र ,कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यात चांगली मागणी होत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी माडग्याळ मेंढी पैदास झाली त्या ठिकाणी येऊन माडग्याळ मेंढ्या खरेदी केल्या. खूप चांगल्या पद्धतीने देखण्या मेंढ्या मेंढपाळ यांनी सांभाळले आहेत. 
आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे म्हणाले,आमच्या तालुक्यातील कोणीकोनुर सारख्या छोट्याशा गावात माडग्याळ मेंढीचे चांगल्या पद्धतीने संवर्धन केले आहे. त्यामुळे दादांनी आज आमच्या तालुक्यात घेऊन जातिवंत माडग्याळ मेंढीची खरेदी केली.माडग्याळ मेंढीची पैदास करणाऱ्या मेंढपाळाच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न करावेत,असेही कांबळे म्हणाले. 
 माजी चेअरमन ज्ञानेश्वर आटपाडकर,संजय कांबळे, अंकुश कोळकर,नवनाथ मस्के,भारत खांडेकर, सिकंदर पटाईत,समाधान पडळकर, भानुदास राजगे,रियाज शेख उपस्थित होते.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहितेपाटील यांनी कुणीकोणूर येथे भेट देऊन मेंढी खरेदी केल्या.