सोन्याळ, वार्ताहर: सोन्याळ ता.जत येथील संघर्ष ग्रुपच्या वतीने जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तम्माणगौडा रवीपाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन आ.विलासराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात 104 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी बोलताना आमदार विलासराव जगताप म्हणाले,एकत्रित येत स्थापलेल्या ग्रुपच्या वतीने सामाजिक कार्यात योगदान देणे गरजेचे आहे. समाजिक बदल घडविण्याची ताकत युवकांत आहे.तसे कार्य वेगवेगळ्या युवा ग्रुपच्या वतीने व्हावे.सोन्याळ मधील संघर्ष युवा ग्रुपचे कार्य आदर्शवत आहे.सामाजिक हितासाठी ते अग्रेसर असतात. असेच काम यापुढेही व्हावे असे आ.जगताप शेवटी म्हणाले.
यावेळी सभापती तम्माणगौडा रवीपाटील, पंचायत समिती सदस्य विष्णू चव्हाण, संघर्ष ग्रुपचे अध्यक्ष तथा ग्रा.प.सदस्य विजयकुमार बगली,संरपच सौ.संगिता निवर्गी, उपाध्यक्ष अशोक बिराजदार, महातेंश बिराजदार, सचिव सोमनिंग पुजारी,सतिश काराजनगी,हणमंत पुजारी, काडसिध्द काराजनगी, जक्कव्वा मुंचडी, सौपान नदाफ,बिरा गारळे,महेश बिराजदार, रामचंद्र हत्तळी, पंढरी संताळे,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन संघर्ष ग्रुपचे बसवराज तेली,तर अाभार महादेव काराजनगी यांनी मानले.

सोन्याळ ता.जत येथे सभापती तम्माणगौडा रवीपाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले.