डफळापूर | विद्यार्थ्याकडे असणारी जिद्दच त्यांना अधिकारी करू शकते : डोंगरे |


डफळापूर,वार्ताहर: विद्यार्थ्याकडे शिक्षणाची आवड,जिद्द व चिकाटी असेलतर तो कोणत्याही अडचणीवर मात करून यशस्वी होऊ शकतो.त्यामुळे मानसिकता बदला.सध्या महिला,शाळकरी मुली बाबत पोलिस प्रशासन दक्ष आहे.कोणीही गैरकृत्य करू नये.असे प्रतिपादन निर्भया पथकाच्या प्रमुख उपनिरक्षक सौ.वर्षा डोंगरे यांनी केले. त्या राजे विजयसिंह डफळे हायस्कूल व ज्यू कॉलेज येथे आयोजित स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व महिला सुरक्षा याविषयी व्याख्यानात बोलत होत्या.
यावेळी मुख्याध्यापक श्री.आपराज हे उपस्थित होते.
डोंगरे पुढे म्हणाल्या,ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परिक्षा चमकतात.मराठी शाळेतून अनेक अधिकारी घडले आहेत. आपल्याला अधिकारी व्हायचे आहे. यांची मनाशी खूनगाठ बांधा तशा पध्दतीने अभ्यास करा,यश निश्चित मिळेलं.डफळापूरच्या डफळे विद्यालयाचे अनिवासी गुरूकुल योजना डफळापूरातील विद्यार्थ्यांना वरदान ठरावे.सर्वात्तम विद्यार्थी घडतील असे प्रयत्न येथील शिक्षकवृंदानी करावेत.असेही यावेळी डोंगरे म्हणाल्या.
मुख्याध्यापक श्री.अपराज सर म्हणाले,विद्यालयातील 8 वी ते 12 पर्यतच्या विद्यार्थ्यांना या निवासी गुरूकुल मुळे स्पर्धापरिक्षेची प्राथमिक तयारी करता येणार आहे. सर्व विद्यार्थीनी यांचा उपयोग करून घ्यावा.
यावेळी पोपट पुकळे, धनाजी चव्हाण,प्रा.अलताफ खतीब आदी मान्यवर उपस्थित होते. श्री.राठोड सर यांनी आभार मानले.
डफळापूर येथील अनिवासी गुरूकुल मध्ये स्पर्धापरिक्षा व महिला सुरक्षा व्याख्यानात बोलताना निर्भाया पथकाच्या प्रमुख डोंगरे,बाजूस मुख्याध्यापक अपराज, पोपटराव पुकळे,व मान्यवर