जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात बुधवारी नवे 9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.तालुक्यातील स्थिती सध्या नियत्रंणात आहे.मात्र नागरिकांचा बेफीकीरपणा धोका वाढवित आहे.
पोलिस, व नगरपरिषद नियत्रंण ठेवण्यात जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून रुग्णांची मोठी संख्या वाढल्याशिवाय आम्ही कारवाई करणार नाही,असा काहीसा प्रकार जतचे पोलीस नगरपरिषदेची झाली आहे.जिल्हाधिकारी यांचे आदेश असतानाही जत पोलीसाकडून विना मास्क,सोशल डिस्टसिंग याबाबत कारवाई होत नाही.
अधिकारीच कार्यालया बाहेर पडत नसल्याने कारवाई करणार कोन अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे शहरातील रुग्ण संख्या वाढीस बळ मिळत आहे. बुधवारी झालेल्या चाचणीत जत शहर 6,डफळापूर 1,प्रतापपूर 1,उटगी 1 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.