भरपूर तलाव असल्याने विस्तारित योजना आधुनिक करणार ; ना.जयंतराव पाटील

जत,संकेत टाइम्स : ऑक्टोबर महिन्यात जत तालुक्यातील जिल्हा परिषद
गटनिहाय(मुख्य गावाचा)दौरा करत लोकांचे प्रश्न सोडविणार आहे.65 गावातील एकही गाव पाण्यापासून वंचीत राहणार नाही,असे नियोजन केले असल्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी संख येथील मेळाव्यात स्पष्ट केले.



ना.पाटील पुढे म्हणाले,6 टीएमसीच्या पाण्यावर जत तालुक्याचा हक्क जत तालुक्यासाठी दोन आवर्तने करण्याचा विचार आहे.त्यासाठी मोठ्या साठवण तलावाची व जागेची गरज,ही एक नवी संकल्पना आहे. सध्या जत तालुक्यातील लाभ क्षेत्रातील
येणारे सिंचन तलाव भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. 65 गावात भरपूर तलाव असल्याने विस्तारित योजना आधुनिक
करणार असल्याचे यावेळी ना.जंयतराव पाटील यांनी स्पष्ट केले.



जिल्हा परिषदचे ‌माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील यांनी लोकनेते राजारामबापू पाटील यांनी तालुक्यात केलेल्या कामाचा यावेळी आवर्जून उल्लेख केले.त्यावर बोलताना ना.पाटील म्हणाले,राजारामबापूचे‌ जत तालुक्यावर विशेष प्रेम होते.ते प्रत्येक आठवड्यात जत तालुक्यात येत असतं,पदयात्रा व त्यांची जतच्या पाणी प्रश्नाविषयीची तळमळ पाहिली आहे.त्यामुळे जलसंपदा खाते आल्यापासून तालुक्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,पुढील दोन तीन वर्षाच बापूचे स्वप्न पुर्ण करू,असे आश्वासनही ना.पाटील‌य यांनी दिले.
रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी तालुक्यातील प्रश्नाबाबत‌ यावेळी माहिती दिली,त्यानुसार येत्या ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय प्रमुख गावात आढावा बैठकी घेण्यात येणार आहेत.तेथे नागरिकांचे प्रश्न विस्तृत पणे समजू शकतात.ते तात्काळ सोडविणेही शक्य‌ होते.
माजी नगरसेवक भैया कुलकर्णी यांनी जत शहराच्या पाणीप्रश्नाचे लक्ष वेधले,तोच धागा पकडत मंत्री पाटील यांनी सध्याच्या युवा पिढीकडे वेगळा दृष्टीकोन असून त्यांची प्रभावीपणे काम करण्याची जिद्द असते,अशा
युवा पिढीला राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच बळ देईल.