पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, केंचाप्पा कनमडी हा पत्नी,पाच मुलासह बाबानगर(विजापूर)येथे राहतो.द्राक्ष बागांना लागणारे साहित्य तो पुरवत होता.रविवारी तो मुंचडी या मुळ गावी आला होता.केंचाप्पा कनमडी रविवारी सकाळी 11.00 वाजचा घरापासून काही अंतरावरील विहिरीकडे गेला होता.बराच वेळ तो घरी न आल्याने आई-वडीलांनी शोधाशोध केली.त्यावेळी त्यांचा मृत्तदेह विहिरीत बुडालेला आढळून आला.याबाबत जत पोलीसांना कळविण्यात आले.पोलीस व नागरिकांनी मृत्तदेह घराबाहेर काढला.जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृत्तदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.