सांगली : कोव्हीड-19 मुळे उदभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव दिनांक 10 सप्टेंबर ते दि. 19 सप्टेंबर 2021 या कालावधी साजरा करणे संदर्भात कोव्हीड- 19 विषाणूचा वाढता संसर्ग पाहता जनजीवन विस्खळीत होऊ नये, आरोग्य विषयक तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका/ पोलीस प्रशासन यांची यथोचित पुर्व परवानगी घेणे आवश्यक राहील, श्री गणेशमुर्ती सार्वजनिक मंडळां करिता 4 फुट व घरगुती गणपती करिता 2 फुटांच्या मर्यादेत असावी, कोव्हीड 19 संदर्भात केंद्र शासन, राज्यशासन व जिल्हा प्रशासनाने जिल्हया मध्ये वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार सर्व निर्बंध कायम राहतील त्यामध्ये गणेशोत्सवा निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही, श्री.चे मुर्ती चे विसर्जन घरगुती पध्दतीने अथवा प्रशासनाने उपलब्ध करुन दिलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडामध्ये करावे. असे आवाहन मिरजचे तहसिलदार डी. एस. कुंभार यांनी केले आहे.