पैशासाठी तहसीलदारांची नियुक्ती अडविली ; जगताप | प्रांत कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन प्रांत कार्यालयासमोर भाजपचे बोंबाबोब आंदोलन

जत,संकेत टाइम्स : जतचे‌ विद्यमान आमदार यांना अधिकाऱ्यांकडून पैसे हवे आहेत,त्यामुळे त्यांनी मर्जीतील तहसीलदार नेमणूक करण्यासाठी नियुक्ती झालेल्या तहसीलदाराला हजर करून घेण्यास विरोध केला आहे,असा गंभीर आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला.
जत,संख येथे तब्बल महिनापेक्षा जादा कालावधी होऊनही तहसीलदार मिळाला नसल्याच्या निर्षेधार्थ जत भाजपाच्या वतीने माजी आमदार विलासराव जगताप व भाजपाचे नेते डॉ.रविंद्र आरळी यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोब आंदोलन करण्यात आले. यावेळी महाआघाडी सरकार,विद्यमान आमदाराविरोधात घोषणा देत बोंबाबोब करत प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांना निवेदन देण्यात आले.



यावेळी तालुकाध्यक्ष सुनिल पवार,सभापती मनोज जगताप,जिल्ला परिषद सदस्य तम्मणगौडा रवीपाटील,
अँड.प्रभाकर जाधव,उमेश सांवत,संग्राम जगताप, बसवराज‌ पाटील,आप्पा मासाळ,सुनिल छत्रे व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
जगताप पुढे म्हणाले,महाआघाडीचे सरकार व जत तालुक्याचे विद्यमान आमदार पुर्णत: अपयशी ठरले आहेत.त्यांना सर्वात कमिशन पाहिजे आहे.त्यामुळे तालुक्यातील त्यांच्या मर्जीतील अधिकारी नेमण्यासाठी तालुक्यातील अनेक अधिकारी पदे‌ रिक्त आहेत.महत्वाचे म्हणजे जत एक महिन्यापासून,संखला अडीच महिन्यापासून तहसीलदार पद रिक्त आहे.तालुक्याला महत्वाचे अधिकारी नसल्याने जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.शासकीय कामे अडली आहेत.मात्र विद्यमान आमदारांच्या हट्टापायी नेमलेले अधिकारी हजर करून घेतले जात नाहीत.पैसे देणाऱ्या अधिकाऱ्यांना शिफारस पत्र देण्यात येतात.तेच अधिकारी दिलेले पैसे काढण्यासाठी जनतेच्या मानगुटीवर बसून पैसे ओरबडतात.यात बद्दल झाला पाहिजे अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशाराही जगताप यांनी दिला.

तालुक्यातील अधिकारी बदल्या, रस्त्याचे‌ टेंडर,कोणत्याही विकास कामात त्यांचे कमिशन हा महत्वाचा विषय बनला आहे. त्यामुळे चांगले अधिकारी येत नसल्याने तालुक्याचे नुकसान होत आहे. अशाच पध्दतीने बँकेच्या अधिकाऱ्यांच्या सहा महिन्यात चारवेळा बदल्या करण्यात आल्या आहेत.त्यामुळे पिक कर्जवाटपात शेतकऱ्यांना त्रास होतो आहे.नियमित कर्ज वाटप करणाऱ्या शेतकऱ्यांना कोणेतही अनुदान दिले जात‌ नाही.सरकारकडे कोणताही ठोस असा कृतीशील कार्यक्रम नाही.
शासनाकडे पैसे नाहीत, त्यामुळे पंचनाम्यापुढे काहीही होत नाही.मदतीसाठी सरकार हात‌ वर करत आहे.

डॉ.रविंद्र आरळी म्हणाले, तालुक्यात महत्वाचे अधिकारी पदे रिक्त आहेत.खरे वास्तविक विद्यमान आमदार सरकारने तालुक्यातील अधिकाऱ्यांची पदे तात्काळ भरायला पाहिजे होती.मात्र अनेक महिन्याचे कालावधीत होऊनही तालुक्यातील महत्वाचे अधिकारी नसतीलतर सामान्य जनतेचे‌ हाल कोन बघणार,या गंभीर प्रकाराकडे शासनाचे लक्ष वेधावे म्हणून हे बोंबाबोंब आंदोलन आम्ही केले आहे.


जतेत भाजपाच्या वतीने माजी आमदार विलासराव जगताप, डॉ. रविंद्र आरळी यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोब आंदोलन करण्यात आले.