जत,संकेत टाइम्स : सिनर्जी हॉस्पिटल मिरजचे चेअरमन तथा जत शहरातील प्रसिद्ध डॉक्टर रविंद्र आरळी यांची भाजपा वैद्यकीय आघाडी सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते डॉ.आरळी यांना निवडीचे पत्र दिले.
जत तालुक्यातील भाजपाचे मोठे,जेष्ठ नेते म्हणून डॉ.आरळी यांचे नाव आहे. भाजपाच्या अडचणीच्या काळात त्यांनी भाजपाला तळागाळापर्यत पोहचविण्याचे काम केले आहे.त्याशिवाय जत शहरात त्यांचे मोठे हॉस्पिटल, शिक्षण संस्था,पतसंस्था, लायन्स क्लब अशा माध्यमातून लोकहिताचे काम सुरू आहे.
गत विधानसभा निवडणूकीत ते भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते,मात्र पक्षाने तिकिट नाकारल्यानंतर त्यांनी बंड करत तिसऱ्या आघाडीतून निवडणूक लढविली होती.तेव्हापासून ते नाराज होते.नुकतेच सनमडी येथील भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनिल पवार यांच्या बन्धूंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात माजी आमदार विलासराव जगताप यांनी केलेल्या आवाहानानंतर त्यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला होता.
त्यांच्या आतापर्यतच्या भाजपातील कामाची दखल घेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना वैद्यकीय आघाडीच्या प्रदेश कार्यकारीवर काम करण्याची संधी दिली आहे.
यावेळी खा.संजयकाका पाटील,आ.सुधीर गाडगीळ,सुरेश खाडे,पृथ्वीराज देशमुख,माजी आमदार विलासराव जगताप,जि.प.अध्यक्षा प्राजक्ता कोरे,बाबा देशमुख,माजी मंत्री शिवाजी नाईक,संग्रामसिंह देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.रविंद्र आरळी म्हणाले, माझ्या रक्तात भाजपा भिनला असून पक्ष नेतृत्वाने दिलेल्या संधीचे सोने करत भाजपा वाढविण्यासाठी प्रयत्न करत राहीन
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जतचे प्रसिद्ध वैद्यकीय व्यवसायिक डॉ.रविंद्र आरळी यांना निवडीचे पत्र देताना,बाजूस
माजी मंत्री शिवाजी नाईक, आ.सुधिर गाडगीळ,पृथ्वीराज देशमुख आदी